News18pro.com

उसाचं पूर्ण गाळप केल्याशिवाय कारखाने बंद करू नये कारखान्यांना इशारा

 पूर्ण गाळपाशिवाय  कारखाने बंद करू नये कारखान्यांना इशारा.

पूर्ण गाळपाशिवाय  कारखाने बंद करू नये कारखान्यांना इशारा.

                पूर्ण गाळपाशिवाय  कारखाने बंद करू नये कारखान्यांना इशारा.

महाराष्ट्र मध्ये  चालू वर्षी ऊस गाळप साखर उत्पादनात देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, चीन, आणि पाकिस्तान या देशांनाही महाराष्ट्राने यंदा मागे टाकला आहे. आतापर्यंत महाराष्‍ट्रात 11 कोटी 12 लाख 34 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे.  त्यामुळे 11 कोटी 54 लाख 18 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड साखर उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेशला यंदा महाराष्ट्राला मागे टाकत प्रथम स्थान मिळवले आहे. पातळीवर चालू वर्षी तीन कोटी 47 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याची आवश्यकता आहे, त्यात महाराष्ट्राचा वाटा एक कोटी मॅट्रिक राहणार आहे त्यामुळे साखर उत्पादनात महाराष्ट्राचा तो जवळपास 39 टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास साखर आयुक्तांनी व्यक्त केलाय साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र प्रथम स्थानी असून राज्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. महाराष्ट्र साखरेचे सर्वाधिक 11.1 75 टक्के उत्पन्न कोल्हापूर विभागातील आहे, राज्यात 98 सहकारी तर 99 खासगी साखर कारखान्यांचा हंगाम सध्या सुरू आहे.

ऊस हे सर्वात नगदी पीक असले तरी यंदा ते नुकसान्कारक  ठरत आहे. यंदाच्या गळीत गाळप हंगामास 7 महिने पूर्ण होऊन देखील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे वजनात घट तर निश्चित मानली जात आहे, पण हंगामात ऊसाची तोड होणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल करुन ऊसाची लागवड केली मात्र, पहिल्याच वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्याने आगामी काळात ऊस लागवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल, अशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

               महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत, जवळपास तीस सहकारी साखर कारखाने मध्ये चालू असल्यामुळे तरीपण उसाचा गाळप पूर्णपणे झालेले. नाही आता तरी लागवड झालेली आहे, शेतकऱ्यांचा मागील वर्षी जास्त पावसामुळे त्यामुळे आता एप्रिल संपेपर्यंत उसाचे गाळप चालू राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असं कारखान्याकडून सांगण्यात आलेला असलं तरी पण मार्चमध्ये सुद्धा शेतामध्ये ऊस उभा आहे. आणि सध्या खूप ऊन पडत असल्यामुळे आहे. आणि त्यामध्येच वसुली म्हणून महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांची वीज तोडली असल्यामुळे शेतकरी उसाला पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे उसाला तुरा आलेला असल्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे जगावं की मरावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण असंच आता सध्या म्हणत आहे.

           महाराष्ट्रामध्ये सर्वधिक उसाचं क्षेत्र हे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यामध्ये असून घेतल्या तालुक्यांच्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाच शिल्लक आहे. आणि अशी परिस्थिती असताना कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्र बाहेरील ऊसाला प्रार्थना देतात. आणि स्वतःच्या कार्यक्षेत्र मधील वस्तू ठेवतात. पण साखर आयुक्तांनी त्यांना सांगितला आहे की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाचा एकटी प्रसिद्ध शिल्लक राहता कामा नये. परंतु कारखान्यांना माहित आहे की त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी कुठे जाणार नाही पण दुसऱ्या कार्यक्षेत्रात मधील शेतकरीसुद्धा आपल्या सोबत जोडला जावा म्हणून कारखाने आयुक्तांचे आदेश पायदळी तुडवित आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी काय निर्णय देतात हे पाहणं गरजेचं आहे. आपण याच्यावरचा तोडगा निघाला नाही तर शेतकरी हा मोठ्या संकटात पडू शकतो. आणि इथून पुढे जर करायचे असेल, तर शेतकरी माघारी घेऊ शकतो. कारण की शेतकऱ्यांचा ऊस तोडून गेल्यापासून पुढील 15 दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांचे पैसे कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. परंतु कारखाने शेतकऱ्यांचे पैसे 15 दिवसाच्या आत देत नाहीत म्हणू  शेतकरी तक्रार करत आहेत.

             महाराष्ट्र मधील काही कारखाने उसाचे गाळप हंगामाची संपवण्याची तयारीला लागले आहेत, मात्र अजूनही महाराष्ट्र मध्ये 15 ते 20 टक्के ऊसतोड होणे बाकी आहे. ज्यामुळे संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नये असंच शेतकरी संघटनेचा मुन्ना आहे. महाराष्ट्र मध्ये सांगली असेल सोलापूर बीड कोल्हापूर उद्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारखाने आहेत सगळ्यात मोठा कारखाना कवठेमहांकाळ खानापूर तासगाव सांगली मिरज जवळपास या परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उसाची लागवड झालेली आहे. त्यामुळे या दुष्काळी भागामध्ये सुद्धा उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, असल्यामुळे या कारखान्यांना ऊस तोड नाही खूप कठीण झालं आहे. म्हणून आता ज्या शेतकऱ्यांनी उसाच्या नोंदी केल्या नव्हत्या त्यांचा ऊस कारखान्याला जाण्याची शक्यताही धूसर दिसत असल्यामुळे शेतकरी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत. कारण की उसाचे पीक वाढलं आणि जवळपास या परिसरामधील सुद्धा दहा ते पंधरा कारखाने मागच्या वर्षी बंद झाले होते. कारण की ऊस कमी होता आणि हे ऊस कमी असल्यामुळे जे कारखाने बंद पडले. आणि आता या वर्षी उसाचं क्षेत्र वाढले असल्यामुळे कारखान्यात बंदच आहेत. 

                 उसाचे क्षेत्र वाढले त्यामुळे पूर्ण होण्याची शक्यता ही जरा कमीच आहे. म्हणून जवळपास पाच ते दहा टक्के उसाचे गाळप राहण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहेत, आणि साखर आयुक्त आहेत महाराष्ट्राचे यांनीसुद्धा सगळ्यांचे निदर्शनात असा आणून दिलेला आहे. की जवळपास एक दहा टक्के ऊस गाळप होऊन हे राहू शकतो. त्यामुळे त्यांनी तशा सगळ्या कारखान्यांना सूचना आपण दिलेल्या आहेत की तुम्ही तुमच्या परिसरामधील संपूर्ण उसाचे गाळप करावे असे त्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे. साखर आयुक्तालय आणि सुद्धा आयुक्तालयाने अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. की तुम्ही तुमच्या परिसरामधील पाऊस आहे त्या कलेक्टर ला सुद्धा तसे आदेश दिले आहे. की तुम्ही तुमच्या परिसरामधील संपूर्णपणे उसाचे गाळप करून घ्यावा आणि जर तुम्ही उसाचे गाळप न करता. जर तुम्ही कारखाने बंद करत असतील तर कारखान्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश साखर आयुक्त यांनी यापूर्वीच दिले आहेत.

             शेतकरी बांधवांनो आपणा सगळ्यांना माहीतच असेल, की या चालू वर्षी महाराष्ट्र मध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला. आणि याचं कारण म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये उसाचे लागवडीचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तरीपण आपण एक विचार जर केला. आणि सरासरी काढली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून मार्च संपला अजून 20 टक्के ऊस शिल्लक असल्यामुळे सरकार आणि शेतकरी संघटनेने संघटनेने कारखान्यांना इशारा केलेला आहे. की जर तुम्ही हे संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाने बंद करू नये जर बंद केले, तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चिघळलं जाईल शेतकरी संघटनेने केले आहे. 

                  वेळेत उसाची तोड न झाल्यावर नेमका परिणाम काय होतो ?

    उस  लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची आग्रारही राहिलेल आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस  होण्यास सुरवात होते व त्यामधील विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.
उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके डावलून ऊसाची लागवड केली. मराठवाड्यात सरासरीपेक्षा  पाऊस आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनीही हे धाडस केले. पण आता ऊसतोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे दर वाढत आहेत. त्यामुळे पारंपरिक पिके चांगली असे म्हणण्याची वेळ आल्याचे  शेतकरी यांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments