News18pro.com

मराठवाडा झाला शेततळ्यामध्ये नंबर 1 Marathwada became the No. 1 farm

                       मराठवाडा झाला शेततळ्यामध्ये नंबर 1

मराठवाडा झाला शेततळ्यामध्ये नंबर 1 Marathwada became the No. 1 farm

                          मराठवाडा झाला शेततळ्यामध्ये नंबर 1 

                   पाण्याविना शेती आणि शेती विना पाणी अशी म्हण 

                 आता अस्तित्वात आलेली आहे, जर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये काही कोणते पीक घ्यायचे असेल तर, पाण्याशिवाय तो शेतकरी शेतामध्ये जास्त प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेऊ शकत नाही. आणि पहिल्यापासूनच मराठवाडा हा दुष्काळग्रस्त असल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता ही प्रकर्षाने जाणवले जाते, म्हणून आता जसा जसा काळ बदलू लागला तसा तसा मराठवाड्यामधील शेतकरी सुद्धा चांगल्या प्रकारे अपडेट होत आहे. आणि म्हणूनच मराठवाड्यामधील शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी एक पर्यायी साधन म्हणून शेततळे करण्यास आता आघाडी घेतलेली आहे. आता मराठवाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पैकी सगळ्यात जास्त शेततळे मराठवाड्यात निर्माण होत आहेत.

       आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात पैकी जवळपास तीस टक्के शेततळे हे एकट्या औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र मधील औरंगाबाद मध्ये आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जवळपास 57 हजार शेततळे आहेत त्यानंतर नंबर लागतो जालन्याचा, आणि त्या नंबर लागतो बीडचा .बीड मध्ये सुद्धा जवळपास 39 हजार शेततळी शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. आता मराठवाड्यामध्ये एक योजना च्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे, व पोखरा योजना तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या माध्यमातून मागेल त्याला शेततळे ही योजना मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ वापरली जात असल्यामुळे, या योजनेतून जवळपास 93 हजाराच्या पुढे शेततळ्यांची निर्मिती मराठवाड्यामध्ये केलेली आहे.

                                                     तीस टक्के शेततळे हे एकट्या औरंगाबाद

             मागेल त्याला शेततळे योजना असल्यामुळे शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेत आहेत, आणि शेततळ्याची निर्मिती ही करत आहेत. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागेल त्याला शेततळे या योजनेमधून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 14500 शेततळे निर्माण झाले जालना जिल्ह्यामध्ये दहा हजार शेततळी निर्माण झाले. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास दहा हजारच्या आसपास शेततळे निर्माण झाले, हे मागेल त्याला शेततळे या योजनेमधून आणि पोखरा योजनेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तीन हजार शेततळे जालना जिल्ह्यामध्ये अडीच हजार शेततळे आणि बीड जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार शेततळी अशाप्रकारे मागेल त्याला शेततळे आणि पोखरा योजनेमधून सर्वात जास्त लाभ शेतकरी शेततळ्यांचा घेत आहेत.

            शेततळे निर्मितीमुळे शेतकरी आता आधुनिक शेतीकडे ओळखत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. आणि याच अभ्यास जर केला आपण तर या दोन वर्षांमध्ये मराठवाड्यामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा कमी प्रमाणामध्ये आपणास पाहण्यास मिळत आहेत, कारण की शेतकरी समृद्ध जर झाला तर नक्कीच देश समृद्ध होऊ शकतो. म्हणून शेतकरी आता समृद्ध होण्याच्या मार्गावर आहे, आणि त्याला मुख्य कारण म्हणजे आपल्या मराठवाड्यामधील शेततळे. कारण की शेततळ्याच्या माध्यमातून आपण कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाण्याची साठवणूक करू शकतो. आणि आपल्या शेतीला पाण्याचा योग्य नियोजनाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे शेती करू शकतो, आता हे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत झाल्यामुळे शेतकरी आता चांगल्या प्रकारे शेती करत आहे. 

                                              शेततळ्यांचा जिल्हा म्हणून झालेली आहे

                त्यामुळे आपल्याला गरजेनुसारच पाणी वापरता येणे शक्य आहे, शिवाय पाण्याचा वापर सुद्धा आपल्याला योग्य करता करावा लागतो म्हणून आता त्याची सवय सुद्धा शेतकऱ्यांना लागून झालेले आहे. आणि याच निमित्तानं पाण्याचं महत्त्व सुद्धा आता शेतकर्‍यांना पडलेला आहे, म्हणून आता शेतकरी योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करून पाणी व्यवस्थित प्रकारे वापरून शेततळ्यामध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे, आता शेतकरी त्यामुळे पूर्ण शेतीमध्ये उतरत आहे, आणि आपल्या उत्पादन मध्ये चांगल्या प्रकारे वाढ उत्पन्न उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज पूर्ण करण्यासाठी शेततळे ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, कारण की शेततळ्यामुळे गरजेनुसार पाण्याचा उपलब्ध होऊ शकतो. आणि शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न घेणे शक्य होत असल्यामुळे शेतकरी आता डोळे झाकून आणि महत्त्वाचे पाण्याचा वापर करून शेतकरी शेती करण्यासाठी आता सज्ज झालेला आहे.

     मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त शेततळी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असल्यामुळे औरंगाबादची ओळख ही शेततळ्यांचा जिल्हा म्हणून झालेली आहे, कारण की पाण्याचा योग्य वापर करून आपल्या शेतीसाठी सिंचनाची एक मोठा आधार म्हणून शेतकर्‍याकडे पाहिलं जातं. त्याचा परिणाम म्हणून दुष्काळसदृश्य मराठवाडा मध्ये कायम पाण्याची टंचाई असणाऱ्या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्याकडे जो वाढता कल आहे. तो कल आता नक्कीच शेतकऱ्यांना समृद्ध करू शकतो आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा जवळपास दहा हजार कोटी रुपये खर्चून शेतक-यांसाठी शेततळे असेल, आणि त्याच्यामध्ये जी प्लास्टिक अंथरून जी ताडपत्री असते याच्यासाठी सुद्धा भरपूर निधी राखीव ठेवलेला आहे.  
                 आणि मराठवाड्यामध्ये जे 7 जिल्हे आहेत त्या सात जिल्ह्यांपैकी एक नंबर औरंगाबाद, दोन नंबर जालना,  आणि तीन नंबर बीड. अशा तीन जिल्ह्यांमध्ये शेतकरी आता शेततळी मध्ये खूप अग्रेसर झालेले आहेत. आपण पाहिलं तर औरंगाबाद जिल्ह्यामधील बदनापूर घनसांगवी गंगापूर सिल्लोड असे अति दुष्काळ सदृश्य शेततळ्यात या शेततळ्यांमध्ये एकेका तालुक्यांमध्ये असे जवळपास दोन दोन हजार शेततळे निर्माण झालेले आहेत. बीडमध्ये जर पाहिलं अंबाजोगाई बीड पाटोदा असेल अशा प्रकारे सगळ्या तालुक्यांमध्ये आता चांगल्या प्रकारे शेततळ्यांची निर्मिती होत आहे. शेतकरी शेततळ्यासाठी खूप महत्त्वाचे प्राधान्य देत आहेत आणि योग्य प्रकारे शेती करत आहेत.

                            शेततळ्यामध्ये आपण जवळपास दोन कोटी लिटर पाणी साठवू शकतो

        आपण शेत तळे हे किती प्रकारे करू शकतो? तर शेततळे आपण दहा गुंठ्यांमध्ये करू शकतो 20 गुंठ्यांमध्ये करू शकतो? आणि 30 गुंठ्यांमध्ये सुद्धा आपण शेततळे करू शकतो? साधारणता दहा गुंठ्यांमध्ये शेततळ्यासाठी जमीन ही लागते. परंतु दहा गुंठ्यांमध्ये जवळपास शेतकरी 50 लाख लिटर पाणी एका शेततळ्यामध्ये साठवू शकतो. 20 गुंठ्यांत शेततळे जर असेल तर वीस गुण त्यांच्या शेततळ्यांमध्ये त्याची लांबी रुंदी असते ते 30 मीटर आणि अशा या शेततळ्यामध्ये एकूण खर्च मागेल त्याला शेततळे योजने मधून तर सरकार फ्री मध्ये शेततळे खान देतो. परंतु प्लास्टिक साठी जो खर्च येतो तो साधारणता खर्च असतो जवळपास दोन लाख रुपये पर्यंत आणि त्याच्यामध्ये सरकार हे जवळपास 50 टक्के सबसिडी देत आहे. 
       
           म्हणजे शेततळे निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याला फक्त एक लाख रुपयांमध्ये शेततळे तयार होत असल्यामुळे शेतकरी या शास्वत पाण्याच्या सिंचनाकडे आता शेतकरी वळला आहे. आणि आपण जर पाहिलं तर एक एकरात मधील शेततळे आहे या एकर शेततळ्यामध्ये आपण जवळपास दोन कोटी लिटर पाणी साठवू शकतो. म्हणजेच हे पाणी संपूर्ण उन्हाळा मार्च एप्रिल मे अशा तीन महिन्यांमध्ये जवळपास पाच एकर शेतीमध्ये उत्पन्न घेऊ शकतो. या एक एकर चा शेतकऱ्यांमधून म्हणूनच शेतकऱ्यांना आताच शेततळी निर्माण करण्याकडे खूप मोठा कल झालेला आहे.

Post a Comment

0 Comments